शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 21:08 IST

हरियाणातील नूहमध्ये भडकलेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलिसही जखमी झाले.

हरियाणातील नूह जिल्ह्यातील भडकलेल्या हिंसाचाराची आग आता राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. राजस्थानच्या भिवडीमध्येही मांसाच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भिवडीमध्ये अलवर बायपासवर असलेल्या मांसाच्या दुकानांची तोडफोड होत असल्याचे पाहून लोकांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी दुकानांची तोडफोड केल्यानंतर माल घेऊन पसार झाले.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस येत असल्याचे पाहून हल्ला करणारे जेनेसिस शॉपिंग मॉलमध्ये घुसले. पोलिसांनी तत्काळ मॉलला चारही बाजूंनी वेढा घातला. सध्या पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून मॉलमध्ये शोधमोहीम सुरू आहे.

नूह हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू हरियाणाच्या नूहमध्ये तणावाचे वातावरण असताना राजस्थानच्या भिवडीमध्ये दुकानांची तोडफोड करण्याची ही घटना समोर आली आहे. नूहमध्ये मिरवणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली. नूह येथील हिंसाचारात दोन होमगार्डसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर पोलिसही जखमी झाले आहेत. नूहची आग हळूहळू त्याच्या लगतच्या भागात पोहोचत आहे. नूहला लागून असलेल्या सोहना येथेही हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

केंद्राकडून रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 कंपन्या मागवल्यानूह येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून केंद्रीय दलाच्या 15 कंपन्या हरियाणाला पाठवण्यात येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 कंपन्या एका आठवड्यासाठी पाठवण्याची विनंती केंद्राला केली आहे. यासाठी केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानHaryanaहरयाणाagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस