शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

महिला प्रशिक्षकाचा विनयभंग; भाजपाच्या क्रीडा मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 12:45 IST

भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात चंदिगड पोलिसांत महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात चंदिगड पोलिसांत महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चंदीगडच्या एसपी यांची भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकाने क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली होती. आता मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंदीगड येथील सेक्टर 26 पोलीस ठाण्यात कलम-354, 354A, 354B, 342, 506 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी लेडी कोचने चंदीगड पोलीस मुख्यालयात जाऊन एसएसपींची भेट घेतली यानंतर तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासासाठी 26 पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ डोस : पाॅलिसीत सूट, इरडाईची विमा कंपन्यांना सूचना

सिंग यांच्याविरोधात ज्युनियर महिला प्रशिक्षकाने आरोप केला आहे, मंत्री संदीप सिंग यांनी महिलेला चंदीगड येथील निवासस्थानी बोलावून  विनयभंग केला असल्याच तक्रारीत म्हटले आहे.  काही महिन्यांपूर्वी महिला प्रशिक्षक पंचकुलामध्ये क्रीडा विभागात प्रशिक्षक म्हणून रुजू झाली होती, पण सिंग यांनी हस्तक्षेप करून बदली केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला कोचने आयएनएलडी नेते अभय चौटाला यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. दस्तऐवज पडताळणीच्या बहाण्याने मंत्र्याने त्यांना चंदीगडमधील सेक्टर-7 येथील घरी बोलावले होते, असा आरोप केला आहे.

क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकाच्या आरोपांचे खंडन केले आहे. महिला प्रशिक्षकाची बदली झाली, त्यामुळेच ती आरोप करत असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी