...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नावरून परतणाऱ्या कारची बसला धडक, 5 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:28 IST2024-03-06T11:27:01+5:302024-03-06T11:28:51+5:30
लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला.

फोटो - hindi.news18
हरियाणातील रेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे रोडवेज बस आणि कारची जोरदार धडक झाली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रेवाडी-महेंद्रगड मार्गावरील सिहा गावाजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ज्यांना आपला जीव गमवावा लागला ते लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला. त्यानंतर हरियाणा रोडवेजची बस आणि बलेनो कारची रेवाडी-महेंद्रगड रोडवर सिहा गावाजवळ धडक झाली, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी बलेनो कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत मृत्यू झालेले लोक चरखी दादरी येथील चांगरोड गावचे रहिवासी होते.