शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 1:03 AM

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत

चंदीगड : टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा पूर्णपणे सज्ज आहे, असे हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी रविवारी म्हटले आहे. रेवाडी जिल्ह्यात टोळधाडीचा हल्ला वेळीच परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. दरम्यान, त्या जिल्ह्यात टोळधाडीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत. ही टोळधाड एका राज्यातून दुसºया राज्यात जात असून, त्यांच्या मार्गात येणारी पिकेही नष्ट करीत आहेत. यापूर्वी मे महिन्यात टोळधाडीने राजस्थानमध्ये हल्ला केला होता. त्यानंतर पंजाब, गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशात पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे. दलाल यांनी म्हटले आहे की, टोळधाडीच्या हल्ल्यातून पिके वाचविण्यासाठी आमच्याकडे कीटकनाशक व यंत्रांचा पुरेसा साठा आहे. टोळधाड पीक, झाडे व जमिनीवर बसताच आमचे अधिकारी तात्काळ कारवाई करतात. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता रेवाडीमध्ये टोळधाडीने प्रवेश केला होता.रात्री जाटुसाना गावात त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी प्रशासनाला ३५ टक्के टोळधाड हटविण्यात यश आले. आम्हाला वाटले होते की, टोळधाड रोहतक व सोनिपतकडे सरकतील; परंतु हवेच्या प्रवाहाने त्यांची दिशा बदलली. त्यामुळे टोळधाड गुरुग्राम, दिल्ली व पुन्हा उत्तर प्रदेशकडे सरकली. टोळधाडीच्या हल्ल्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, तसेच हानी झालेल्या शेतकºयांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरले, असा आरोप काँग्रेसने केला होता. तो कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी फेटाळून लावला.ढोल, भांडे वाजविण्याचे आवाहन

  • टोळधाड घालवण्यासाठी लोकांनी ढोल, भांडे वाजवावेत, तसेच मोठ्या आवाजात संगीत वाजवावे किंवा फटाके वाजवावेत.
  • टोळधाड बहुतांश करून दिवसा हल्ला करतात व रात्री आराम करतात. त्यामुळे त्यांना रात्री आराम करू दिला जाऊ नये.
टॅग्स :HaryanaहरयाणाPakistanपाकिस्तान