ट्रक-रोल्स रॉयसची जोरदार धडक, ट्रकमधील 2 जणांचा मृत्यू, कारमधील सर्व जण सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:55 IST2023-08-23T18:52:28+5:302023-08-23T18:55:27+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर धडकल्यानंतर, लिमोजिन कारला आग लागली. मात्र त्यात स्वार सर्व पाच लोकांना त्यांच्या नातलगांनी वाचवले. जे दुसऱ्या कामरमध्ये मागे बसलेले होते.

ट्रक-रोल्स रॉयसची जोरदार धडक, ट्रकमधील 2 जणांचा मृत्यू, कारमधील सर्व जण सुरक्षित
हरियाणातील नूंहमध्ये दिल्ली-मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गावर ट्रक आणि एका आलिशान कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका तेल टँकर ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजते. तर रोल्स-रॉयस कारमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मंगळवारी दुपारी घडली. संबंधित ट्रक राँग साईडने जात असताना नगीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी गावाजवळ या कारला धडकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर धडकल्यानंतर, लिमोजिन कारला आग लागली. मात्र त्यात स्वार सर्व पाच लोकांना त्यांच्या नातलगांनी वाचवले. जे दुसऱ्या कामरमध्ये मागे बसलेले होते.
जखमींवर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालया उपचार -
याच बरोबर त्यांनी सांगितले की दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये टँकर ट्रक चालक रामप्रीत आणि त्याचा सहकारी असलेल्या कुलदीपचा समावेश आहे. हे दोघेही उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोल्स रॉयसमध्ये स्वार तीन जखमींमध्ये चंदीगड येथील दिव्या आणि तस्बीरचा, तर दिल्ली येथील रहिवासी आहे. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचास सुरू आहेत.