शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 20:45 IST

Haryana Election Results: चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...

Haryana Election Results 2024 : आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरयाणात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षानेही नशीब आजमावले. पक्षाने 20 जागांवर निवडणूक लढवली. दुष्यंत चौटला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षासोबत युती करणाऱ्या आझाद समाज पक्षाला चांगल्या परिणामाची आपेक्षा होती, पण तसे झाले नाही. 

या निवडणुकीत चंद्रशेखर यांच्या पक्षाची अतिशय वाईट अस्था झाली. काही जागांवर तर ASP उमेदवाराला 500 पेक्षाही कमी मते मिळाली. अंबाला शहरात आझाद समाज पक्षाच्या पारुल नागपाल उदयपुरिया यांना 2423 मते मिळाली. या जागेवर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. जगाधरीमधील उमेदवाराला केवळ 2684 मते मिळाली. या जागेवर ते पाचव्या क्रमांकावर राहिले. तर, निलोखेरीमध्ये पक्षाचे उमेदवार करम सिंह यांना केवळ 387 मते मिळाली.

कोणाला किती जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारी किती होती?सोनीपतमध्ये राजेश यांना फक्त 227 मते मिळाली. या जागेवर ते सातव्या क्रमांकावर राहिले. महेंद्रगडमध्ये एएसपीचे शशी कुमार यांना 464 मते मिळाली, ते 9व्या क्रमांकावर राहिले. रेवाडीमध्ये मोकी देवी यांना 206 मते मिळाली, या जागेवर त्या 8व्या स्थानावर होत्या. सोहना जागेवर आझाद समाज पक्षाच्या विनेश गुजर घटाला 2040 मते मिळाली. पुनहाना येथील अताउल्ला 829 मतांसह पाचव्या क्रमांकावर होते. तर, प्रिथला जागेवर गिरिराज जटोला यांना 270 मते मिळाली.

हरयाणाचे निकालहरियाणात भाजप 48, काँग्रेस 37, आयएनएलडी 2 आणि इतरांना 3 जागा मिळाल्या. तर, दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला एकही जागा जिंकता आली नाही. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर भाजपला 39.93 टक्के,  काँग्रेसला 39.10 टक्के, बसपाला 1.82 टक्के आणि जेजेपीला 0.90 टक्के मते मिळाली आहेत.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा