शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:27 IST

हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, हरियाणामध्ये आतापर्यंत कुठल्याही पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवता आलेला नाही. 

हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. येथे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, विविध संस्थांनी एक्झिटपोल जारी केले होते. त्या एक्झिटपोलमध्ये हरियाणात काँग्रेसला संधी मिळेल, तर भाजपची धूळ-धाण उडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात या संस्थांनी हरिणाच्या बाबतीत दिलेला एक्झिट पोल पूर्णपणे फोल ठरला आहे. हरिणायात भाजपचे विजयाची हॅट्रीन नोंदवत गुलाल उधळला आहे. हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, हरियाणामध्ये आतापर्यंत कुठल्याही पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवता आलेला नाही. 

यातच आता केंद्रीय मंत्री तथा बिहारमधील बेगूसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. गिरिराज सिंह यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर, 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमाने थेट लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. "आपण फॅक्ट्रीवाली जिलेबी राहुलजींसाठी आणली आहे. माननीय खर्गेजी यांनी राहुलजींचा पत्ता सांगावा. ती जिलेबी कुठे पाठवू?" अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी गोहानातमध्ये खाल्ली होती  जिलेबी -हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या विजय संकल्प यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गोहाना येथील मातुरामची जिलेबी खाल्ली होती. या जिलेबीची टेस्ट त्यांना प्रचंड आवडली होती. ही जिलेबी देश-विदेशात गेल्यास या दुकानाचे रुपांतर एखाद्या फॅक्ट्रीत होईल आणि हजारो लोकांना रोजगारही मिळेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावरूनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस