शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात मोठा भाजपला झटका, चौधरी देवीलाल यांचे नातू आदित्य चौटाला यांचा INLD मध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 15:49 IST

haryana assembly election 2024 : आदित्य चौटाला हे चौधरी देवीलाल यांचे नातू आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता

haryana assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच एका मागोमाग एक असे झटके पक्षाला बसत आहेत. दोन दिवसांपूर्वी तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या रणजीत सिंह चौटाला यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे रणजीत सिंह चौटाला यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

आता आदित्य चौटाला यांनी आयएनएलडीमध्ये (INLD) प्रवेश केला आहे. आदित्य चौटाला यांनी दोन दिवसांपूर्वीच हरियाणा कृषी पणन मंडळाचा राजीनामा दिला होता. INLD आमदार अभय सिंह चौटाला यांनी आदित्य चौटाला यांचा समावेश केला. आदित्य चौटाला आयएनएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. यावेळी अभय सिंह चौटाला यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, आयएनएलडी पक्ष सतत वाढत आहे. भाजपचे आणखी बडे नेते आयएनएलडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत.

दरम्यान, आदित्य चौटाला हे चौधरी देवीलाल यांचे नातू आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०१९ मध्ये, भाजप सरकारने त्यांना राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक लिमिटेडचे ​​अध्यक्ष केले होते. चौटाला यांनी दोन दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला होता. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य चौटाला यांनी डबवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा काँग्रेस उमेदवार अमित सिहाग यांच्याकडून पराभव झाला होता.

अभय सिंह चौटाला यांच्या पत्नीचा केला होता पराभवआदित्य चौटाला यांनी २०१६ च्या पंचायत निवडणुकीत अभय सिंह चौटाला यांची पत्नी कांता चौटाला यांचा पराभव केला आहे. दरम्यान, आदित्य चौटाला यांनी सिरसा जिल्हा परिषदेच्या झोन-४ मधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आदित्य चौटाला विजयी झाले होते.  

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा