शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

Harsh Goenka : "एका मोदीला मिस इंडिया हवी अन् दुसऱ्यांना..."; हर्ष गोएंकांच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 11:53 IST

Harsh Goenka Tweet : हर्ष गोएंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि फरार उद्योगपती नीरव मोदी या तिघांची तुलना करत एक मार्मिक ट्वीट केलं आहे.

नवी दिल्ली - ललित मोदी (Lalit Modi) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. १४ जुलै रोजी ललित मोदींनी सुष्मितासोबतचे बरेच व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले होते आणि ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि ते चर्चेत आले. सुष्मिता सेन आणि ललित मोदी इटलीतील एका सुंदर बेटावर एकत्र व्हॅकेशनसाठी गेले होते. यानंतर ललित मोदी पुन्हा लंडनला गेले आणि सुष्मिता सेनसोबतचे फोटो पोस्ट केले. याच दरम्यान उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक भन्नाट ट्वीट केलं आहे. 

हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि फरार उद्योगपती नीरव मोदी या तिघांची तुलना करत एक मार्मिक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी, ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा फोटो देखील वापरला आहे. "एका मोदींना 'इंडिया' हवी आहे. दुसऱ्या मोदीला 'मिस इंडिया' हवी आहे आणि तिसरा मोदी इंडियात हवा आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांचं हे ट्विट जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हर्ष गोएंका यांनी ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही खास फोटो शेअर केल्यानंतर देखील हटके ट्वीट केलं होतं. "मी ललितला फोन केला आणि विचारलं की तुला हे कसं जमलं? तो मला 'सेन'सेशनल उत्तर देत म्हणाला, "मोदी है तो मुमकिन है" असं गोयंका यांनी म्हटलं होतं. ललित मोदींच्या पोस्टनंतर २० तासांनंतर सुष्मिता सेननेही फोटोंवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. ललित मोदींसोबतचे नाते समोर आल्यानंतर सुष्मिता सेनने पहिली पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या मुली, रेनी आणि अलिशासोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की ती खूप आनंदी आहे. तिने लिहिले, 'मी सध्या माझ्या आनंदी ठिकाणी आहे. माझे लग्न झालेले नाही. अंगठी नाही. ते फक्त अपार प्रेम आहे. सुष्मिता आणि ललित यांचे फोटो समोर आल्यानंतर आणि त्यांचे ट्विट वाचून सर्वजण चकित झाले. त्याचवेळी दोघांचे लग्न झाल्याचे काहींना समजले. सुष्मिताच्या हातात हिऱ्याची मोठी अंगठी दिसली. हे पाहून लोकांना अंदाज आला की दोघांची एंगेजमेंट झाली आहे. मात्र, काही ट्विटला उत्तर देताना ललित यांनी तसे नसल्याचे म्हटले होते. दोघेही सध्या एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही किंवा एंगेजमेंट झालेली नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNirav Modiनीरव मोदीLalit Modiललित मोदीSushmita Senसुश्मिता सेन