शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हारी बाजी को जितना उन्हे आता है!!!

By balkrishna.parab | Updated: December 18, 2017 19:00 IST

22 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र...

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठताना भाजपाची पुरती दमछाक झाली. पण अडखळत धडपडत का होईना भाजपाला बहुमताचा जादुई आकडा गाठून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यशस्वी ठरले. जीएसटी, नोटाबंदीमुळे असलेली नाराजी, पटेल आरक्षणाचा पेटलेला मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे 22 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिकट परिस्थितीत मोर्चा सांभाळत भाजपाला हरलेली बाजी दिंकून दिली.  खरंतर गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला, हिंदुत्वाची प्रयोगशाळा, मोदींच्या विकासाचे मॉडेल वगैरै वगैरे असल्याने काही झालं तरी गुजराती मतदार भाजपाला साथ देणार हे निश्चित मानले जायचे. 1995 पासून झालेल्या गुजरात विधानसभांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजपाने भक्कम बहुमत मिळवलेले. त्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत तर गुजरातमधून लोकसभेच्या 26 पैकी 26 जागा भाजपाने जिंकलेल्या. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र प्रत्यक्षात दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात गुजरातमध्ये नाराजी मूळ धरत होती. पाटीदार आंदोलनातून या नाराजीला तोंड फुटले. पुढे दलित अत्याचाराच्या मुद्यावरून जिग्नेश मेवाणी आणि ओबीसींच्या प्रश्नावरून अल्पेश ठाकोर याने संघटन सुरू केले. जीएसटीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांच्या नाराजीला हवा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कधी नव्हे ती गुजरातमध्ये आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली. राहुल गांधीच्या मंदिर भेटीमुळे हिंदुत्ववाचा मुद्दा बोथट झाला. त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेही भाजपाच्या गोटात धाकधुक निर्माण झाली होती. प्रचाराला सुरुवात झाल्यावर तर काँग्रेसने गुजरात गमावल्यात जमा होते. परिस्थिती प्रतिकूल असताना अखेर अमित शहा आणि नरेंद्र मोदींना मोर्चा सांभाळावा लागला. काँग्रेसच्या जातीय समीकरणावर उतारा म्हणून अमित शहांनी धर्माचे कार्ड खेळण्याचा जुगार खेळला. तर मोदींनीही आपल्या प्रचारसभांमधून पाकिस्तान, गुजराती अस्मिता आदी मुद्द्यांना हवा दिली. त्यात मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या भाजपासाठी टॉनिकचे काम केले. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी केलेल्या बाउन्सरच्या माऱ्यावर गुजरातमधील भाजपा इतकेच काय खुद्द अमित शहा व मोदींची जोडी पुरती शेकून निघाली होती. मात्र याचदरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा नीच असा उल्लेख करून मोदी आणि भाजपाला फुलटॉस दिला. या संधीचा लाभ उठवणार नाहीत ते मोदी आणि भाजपाई कसले. त्यांनी या वक्तव्याच्या जोरावर मतदानाच्या शेवटच्या टप्पात काँग्रेसच्या बाजूने वाहत असलेली हवा आपल्या दिशेने फिरवली. त्यात अमित शहांनी पन्ना प्रमुख ही संकल्पना राबवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भूतकाळात केलेल्या विकासकामांना उजाळा देत मोदींनी जनतेला भावनिक साद घातली. या सर्वांचा परिणाम म्हणून गुजरातमधील जवळपास हरलेली निवडणूक भाजपाला जिंकता आली. पण मिळालेल्या कौलामधून भाजपाला इशाराही मिळालाय. त्याची गंभीर दखल न घेतल्यास भाजपाची भविष्यातील वाटचाल अडचणीची होई शकेल.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा