शनिवार-रविवारी रात्री ईव्हीएममध्ये घोटाळा करून गुजरात जिंकण्याच्या तयारीत भाजपा- हार्दिक पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 05:55 PM2017-12-16T17:55:54+5:302017-12-16T17:57:37+5:30

गुजरातमध्ये भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलं आहे.

Hardik patel targets bjp over evm fraud | शनिवार-रविवारी रात्री ईव्हीएममध्ये घोटाळा करून गुजरात जिंकण्याच्या तयारीत भाजपा- हार्दिक पटेल

शनिवार-रविवारी रात्री ईव्हीएममध्ये घोटाळा करून गुजरात जिंकण्याच्या तयारीत भाजपा- हार्दिक पटेल

Next
ठळक मुद्दे18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला आहे. 

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबर रोजी येणार आहे. ईव्हीएमशी छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपावर केला आहे. तोच धागा पकडून, गुजरातमध्येही भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला आहे. 

शनिवारी ट्विटच्या माध्यमातून हार्दिक पटेलने भाजपावर हे आरोप केले आहेत. 'शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये मोठी गडबड करायला चाचली आहे. भाजपा गुजरात निवडणूक हारणार आहे. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 

गुजरातची निवडणूक हा भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार करून ते ही निवडणूक जिंकतील. पण कुणी शंका उपस्थित करू नये, प्रश्न विचारू नयेत म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये हरतील, असं हार्दिक पटेल याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 
मतदानासाठी ईव्हीएम वापरूनही निकालाला 5-7 दिवस लागत असतील, तर त्यापेक्षा मतपत्रिका वापरणं जास्त चांगलं, अशी सूचक टिप्पणी हार्दिक पटेलनं शुक्रवारी केली होती. 
 

Web Title: Hardik patel targets bjp over evm fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.