जेवताना, जिममध्ये व्यायाम करताना, डान्स करताना, फिरताना, चालताना हार्ट अटॅक येत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
वाहिद हुसेन असं हार्ट अटॅक आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. व्हिडिओमध्ये डॉक्टर अचानक खाली कोसळले आणि जमिनीवर पडले, तेव्हा ते त्यांच्या क्लिनिकबाहेर उभे असल्याचं दिसून आलं आहे. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि डॉक्टरचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही.
क्लिनिकबाहेरच खाली पडल्यानंतर लगेचच डॉक्टरचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे, ज्यामध्ये डॉक्टर खाली कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. डॉ. वाहिद हुसेनच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
डॉक्टरच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर खूप चांगल्या स्वभावाचे होते आणि ते खूप प्रसिद्ध डॉक्टर होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसेच आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या असा सल्ला देखील दिला आहे.
Web Summary : A doctor in Hapur, Uttar Pradesh, Wahid Hussain, died of a sudden heart attack outside his clinic. He collapsed, and despite immediate assistance, he could not be saved. The incident, captured on CCTV, has shocked the community.
Web Summary : उत्तर प्रदेश के हापुड़ में डॉक्टर वाहिद हुसैन को अपने क्लिनिक के बाहर अचानक दिल का दौरा पड़ा और उनकी मौत हो गई। वे गिर पड़े, और तत्काल सहायता के बावजूद, उन्हें बचाया नहीं जा सका। सीसीटीवी में कैद हुई इस घटना से समुदाय सदमे में है।