शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Happy Birthday Narendra Modi : अमित शहांशिवाय नरेंद्र मोदी अधुरेच...पाहा त्यांची मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 09:49 IST

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून इतरांनीही मोदींची साथ सोडली. कठीण काळात केवळ एक माणूस त्यांच्यासोबत राहिला. ते म्हणजे अमित शहा. 

गोष्ट 1995 ची आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 182 पैकी 121 जागा जिंकल्या होत्या. या विजयामध्ये पक्ष सचिव म्हणून नरेंद्र मोदी यांचे महत्वाचे योगदान होते. केशुभाई पटेल हे मुख्यमंत्री झाले. तर मोदी यांचे नेतृत्वाला दुसरा क्रमांक मिळाला. मात्र, ही गोष्ट मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार शंकर सिंह वाघेला यांना फारशी रुचली नाही. त्यांना बहुतांश आमदारांचे समर्थन होते. मात्र, ते मुख्यमंत्री होऊ शकले नसल्याची सल होतीच परंतू दुसरा नंबरचे पदही नसल्याने त्यांनी मोदी यांच्याविरोधात बंड केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय हे पाहून केंद्रीय नेत्यांनी मोदींना दिल्लीमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला गेला. हा एकप्रकारे वनवासच होता. यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून इतरांनीही मोदींची साथ सोडली. कठीण काळात केवळ एक माणूस त्यांच्यासोबत राहिला. ते म्हणजे अमित शहा. 

यानंतर 2010 मध्ये सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर प्रकरणात अमित शहा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सीबीआयने त्यांना 25 जुलै 2010 मध्ये अटक केली होती. त्यांना तीन महिने तुरुंगात घालवावे लागले. काही मिडीया रिपोर्टनुसार मोदी यानंतर काहीसे हरवलेले दिसत होते. तसेच त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्य़ासाठी प्रयत्न करत होते. मोदी यांनी यादरम्यान शाह यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शहा यांना गुजरातमधून हद्दपार केले गेले होते. नंतर शहा यांना या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली.

या दोन्ही घटना मोदी-शहा यांच्या दोस्तीचे पुरावे आहेत. 35 वर्षांच्या या मैत्रीमध्ये अनेक उतार-चढाव आले. परंतू दोघांनीही एकमेकांना साथ दिली. यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. 

 

80 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात भेटले होते. यावेळी शहा तरुण कार्यकर्ते तर मोदी संघ प्रचारक होते. 1984 मध्ये मोदी यांना अहमदाबाद जिल्ह्याचे प्रचारक करण्यात आले आणि शहा भाजपाचे कार्यकर्ते झाले. यानंतर या दोघांमधील संबंध वाढीस लागले. 

शहा यांच्याकडे असलेले चातुर्य आणि सल्ले मोदी यांना खुप प्रभावित करायचेय 1986 मध्ये मोदी गुजरात भाजपचे सचिव बनले. यानंतर शहा यांच्याकडेही मोठी जबाबदारी दिली गेली. सल्ला मसलत, बूथ मॅनेजमेंट आणि रणनीती बनविण्यात शहा यांचा मोलाचा वाटा होता. परंतू 1996 मध्ये केशुभाई पटेल यांच्याविरोधात गेल्याने मोदी यांच्यावर वाईट काळ ओढवला . यावेळीही शहा मोदी यांच्यासोबत राहिले.मोदी यांनी 2001 मध्ये आपल्या राजकीय जिवनातील दुसरी इनिंग सुरु केली. मोदी मुख्यमंत्री बनल्यानंतर शहा यांना कॅबिनेटमधील 17 महत्वाची खाती देण्यात आली. 2003 मध्ये मोदी पुन्हा मुख्यमंत्री बनले. तेव्हा शहा यांना राज्य मंत्रीमंडळात सहभागी केले गेले. त्याच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. यानंतर शहा मोदींच्या आणखी जवळ आले.

 2014 मध्ये मोदी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. यानंतर भाजपच्या विजयासाठी अमित शहा हेच मुख्य रणनीतिकार म्हणून पुढे आले. यानंतर शहा भाजपचे अध्यक्ष बनले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाGujaratगुजरात