पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 02:20 PM2021-10-17T14:20:41+5:302021-10-17T14:21:09+5:30

यादरम्यान हल्लेखोरांकडून परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

hand made bomb attack on crowd returning from Durga vivarjanin West Bengal, many injured | पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी

Next

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये काही लोकांनी दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. बॉम्बच्या आवाजामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. हल्ल्यादरम्यान, आरोपींनी वाहनांची तोडफोडही केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दुर्गापूरच्या अन्नपूर्णा परिसरात लोक दुर्गा विसर्जन करुन परतत असताना हा हल्ला झाला. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आरोपींनी पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूरच्या अन्नपूर्णा परिसरात शनिवारी रात्री काही लोकांनी दुर्गा विसर्जन करुन घरी परतत होते. या दरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. मीडिया रिपोर्टनुसार, यापूर्वी दोन गटांमध्ये दारुवरून भांडण झाले होते. एक गट दुर्गा विसर्जनावरून परतत असताना दुसऱ्या गटाच्या लोकांनी त्यांना वाटेत अडवले आणि दारू खरेदी करण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली.

यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. प्रकरण इतके वाढले की दुसऱ्या गटातील लोकांनी बॉम्बने हल्ला करायला सुरुवात केली. बॉम्बचा आवाज ऐकून गोंधळ उडाला. यानंतर दुसऱ्या गटातील लोकांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली आणि तेथून पळ काढला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. एसीपी ध्रुबज्योती मुखर्जी यांनी सांगितले की, दोन गटांमधील हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

Web Title: hand made bomb attack on crowd returning from Durga vivarjanin West Bengal, many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app