चुंचाळेतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

By Admin | Updated: March 21, 2015 00:15 IST2015-03-20T22:39:43+5:302015-03-21T00:15:47+5:30

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुंचाळे शिवारातील लक्ष्मण टाऊनशिपमधील रो-हाऊसमधील स्लॅबच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. स्लॅबचे बांधकाम तोडताना पालिकेच्या पथकाची चांगलीच दमछाक झाली. त्यासाठी भाड्याने ब्रेकर मागवून कारवाई पूर्ण करण्यात आली.

Hammer on the unauthorized construction of Chukale | चुंचाळेतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

चुंचाळेतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुंचाळे शिवारातील लक्ष्मण टाऊनशिपमधील रो-हाऊसमधील स्लॅबच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. स्लॅबचे बांधकाम तोडताना पालिकेच्या पथकाची चांगलीच दमछाक झाली. त्यासाठी भाड्याने ब्रेकर मागवून कारवाई पूर्ण करण्यात आली.
चुंचाळे शिवारातील लक्ष्मण टाऊनशिपमध्ये पोपट निकम यांनी त्यांच्या रो-हाऊसमध्ये २० बाय १२ चा अनधिकृत स्लॅब टाकला होता. त्याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने सदर स्लॅब हटविण्याची कारवाई केली. सदर कारवाई सातपूर विभागीय कार्यालयाच्या देखरेखीखाली करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.

Web Title: Hammer on the unauthorized construction of Chukale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.