खळबळजनक! उत्तराखंडच्या जेलमध्ये 44 कैदी आढळले HIV पॉझिटिव्ह; अधिकारी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 11:09 IST2023-04-09T11:08:17+5:302023-04-09T11:09:19+5:30
तपासणीत 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! उत्तराखंडच्या जेलमध्ये 44 कैदी आढळले HIV पॉझिटिव्ह; अधिकारी म्हणतात...
उत्तराखंडच्या हल्द्वानी तुरुंगात एका महिलेसह 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासणीत 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. मात्र, कारागृह प्रशासन याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांवर सुशीला तिवारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. परमजीत सिंह यांनी सांगितले की, हॉस्पिटलची टीम महिन्यातून दोनदा कारागृहात नियमित तपासणीसाठी जाते आणि सर्व कैद्यांची तपासणी केली जाते. ज्यांना किरकोळ त्रास होतो त्यांना औषध देऊन जागेवरच बरे केले जाते. ज्यांना जास्त त्रास होतो त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जातात.
एचआयव्ही बाधित कैद्यांवर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी कारागृह प्रशासन कैद्यांची नियमित तपासणीही करत आहे. एचआयव्ही रुग्णांसाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुशीला तिवारी हॉस्पिटलचे डॉ. परमजीत सिंह यांनी सांगितले की एचआयव्ही एड्सची अनेक कारणे असू शकतात जी कोणत्याही एका पैलूवर स्पष्टपणे दिसत नाहीत.
कारागृहात एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कोणत्याही कैद्याला मोफत उपचार आणि औषधे दिली जातात. मात्र, प्रशासनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, अशा प्रकरणावरून कारागृह प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"