एचएएलने करून दिला ८५ लाखाचा नवीन रस्ता सामाजिक बांधिलकीतून
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
ओझर टाऊनशिप : ओझर गावातील कॉलेजरोड म्हणून ओळखला जाणारा कच्चा रस्ता एचएएलने ८५ लाख रुपये खर्च करून डांबरी रस्ता करून दिला.

एचएएलने करून दिला ८५ लाखाचा नवीन रस्ता सामाजिक बांधिलकीतून
ओ र टाऊनशिप : ओझर गावातील कॉलेजरोड म्हणून ओळखला जाणारा कच्चा रस्ता एचएएलने ८५ लाख रुपये खर्च करून डांबरी रस्ता करून दिला.संरक्षण विभागाचा कणा असलेल्या एचएएल कारखान्यात मिग जातीच्या लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. हे उत्पादन करत असतानाच समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक भावेतून एचएएलने ओझर गावातील कॉलेजरोड म्हणून ओळखला जाणारा कच्चा रस्ता डांबरी करून देण्याचे ठरवून दोन महिन्यापूर्वी त्याचे काम सुरू केले.कॉन्ट्रॅक्टरने हे काम मार्च अखेर पूर्ण करून दिले. मारुती वेस ते खदानपर्यंतचा १७०० मिटर लांबीचा हा कॉलेज रोड डांबरी करण्यासाठी एचएएलने ८५ लाख रुपये खर्च केले आहेत. या रस्त्यामुळे कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्या-येण्यासाठी तसेच साईधाम, विमलनगर, पंडित कॉलनी, पंचवड नगर, निवृत्तीनाथनगर आदि नववसाहतीमधील रहिवाशांना ओझर गावात जाण्यायेण्यास सोयीस्कर होणार आहे.त्याचप्रमाणे एचएएलने प्रभू धामजवळील रस्ता तयार केला. त्यासाठी एचएएलने ६४ लाख ४८ हजार रुपये खर्च केले. दीक्षी येथील प्राथमिक शाळेस ॲसेम्बली हॉल तयार करून दिला. त्यासाठी २२ लाख ७६ हजार रुपये खर्च केले. आश्रम ते एस.टी. फ्लॅन्टपर्यंतचा रस्ता १९ लाख ४५ हजार रुपये खर्च व मोहाडी रस्ता तयार करून दिला त्यासाठी एचएएलने ९४ लाख ४१ हजार रुपये खर्च केले आहे.चौकटसध्या ओझर येथील गडाख कॉर्नर ते धन्वंतरी दवाखाना कॉर्नरपर्यंत बसस्थानक समोरील जुना आग्रारोड या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम एचएएलतर्फे करून दिले जात आहे.-----