हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब स्टेजवर महिलेच्या डोक्यावर थुंकला, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:24 IST2022-01-06T15:23:03+5:302022-01-06T15:24:41+5:30
Hairstylist Javed Habib spit on woman's head : लोकांना केस कसे सेट करायचे याच्या टिप्स देताना त्याने प्रथम बागपत येथील बडौत येथे राहणाऱ्या एका महिलेचे डोके पकडले आणि जोराने हलवले, नंतर धक्कादायक पद्धतीने धक्का दिला आणि नंतर तिच्या डोक्यावर थुंकून तिचे केस कापले.

हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब स्टेजवर महिलेच्या डोक्यावर थुंकला, व्हिडिओ व्हायरल
बागपत - प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश येथे एका सेमिनारमध्ये एका महिलेच्या डोक्यावर थुंकला. जावेदने हे कृत्य 3 जानेवारी रोजी मुझफ्फरनगरमध्ये आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये केले होते, परंतु त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये सर्वांसमोर स्टेजवर हे कृत्य त्याने केले. लोकांना केस कसे सेट करायचे याच्या टिप्स देताना त्याने प्रथम बागपत येथील बडौत येथे राहणाऱ्या एका महिलेचे डोके पकडले आणि जोराने हलवले, नंतर धक्कादायक पद्धतीने धक्का दिला आणि नंतर तिच्या डोक्यावर थुंकून तिचे केस कापले.
या घटनेने दुखावलेल्या महिलेने यूपी यूकेशी बोलताना सांगितले की, माझे नाव पूजा गुप्ता आहे आणि माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे ब्युटी पार्लर आहे. मी बडौत येथील रहिवासी आहे. काल मी जावेद हबीब यांच्या एका चर्चासत्रात गेले होते. त्याने मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले आणि त्याने माझ्याशी इतके गैरवर्तन केले की मी खूप दुखावले. जर कोणाकडे पाणी नसेल तर तुम्ही स्वतःच्या थुंकीने केस कापू शकता हे त्यांनी दाखवून दिले आहे. मला या घटनेचे इतके दु:ख झाले आहे की, मी असं ठरवलं रस्त्यावरच्या केशभूषाकाराकडून केस कापून घेईन पण जावेद हबीबकडून केस कापणार नाही.
तिथे काय झाले
कार्यशाळेदरम्यान जावेद हबीब यांनी महिलेच्या केसांवर थुंकताना इस थूक में दम है असं हबीबने सांगितले. त्याने महिलेचा अपमान केला आणि सांगितले की तिचे केस खराब आहेत, कारण तिने शॅम्पू केला नाही. यानंतर, महिलेच्या केसांना विंचरताना तो म्हणतो की, केसांमध्ये पाण्याची कमतरता असल्यास, थुंकीने काम करा. यानंतर त्याने महिलेच्या केसांवर थुंकले. त्यावेळी संकोचामुळे महिलेला प्रतिक्रिया देता आली नाही. याबाबत जावेद हबीबी यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.