शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेंद्रभाई गळाभेट कामी आली नाही’, हाफिज सईदच्या सुटकेवरुन राहुल गांधींचा मोदींना टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 16:47 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.राहुल गांधी यांनी हाफिज सईदच्या नजरकैदेतून झालेल्या सुटकेवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी हाफिज सईदच्या नजरकैदेतून झालेल्या सुटकेवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘नरेंद्र भाई, गळाभेट कामी आली नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट घेतली होती. यावरुनच राहुल यांनी मोदींना टोला लगावला आहे. 

‘नरेंद्र भाई, गळाभेटीने काहीही साध्य झालं नाही. दहशतवादाचा मास्टरमाईंड मोकाटच आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान सैन्याला लष्कर फंडिंगबाबतही क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता मोदी आणि ट्रम्प यांच्या आणखी गळाभेटी घेण्याची आवश्यकता आहे,’ असं ट्विट करुन राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

 

मुंबईवरील 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची दोनच दिवसांपूर्वी नजरकैदेतून सुटका झाली. यानंतरच राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.  याप्रकरणी अमेरिका कठोर भूमिका घेईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारला होती. पण, यानंतर अमेरिकेने दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या बाबतही पाकिस्तानी लष्कराला क्लीन चीट दिली. हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरुनच राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी याआधीही मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीची खिल्ली उडवली होती. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यावर ट्रम्प यांची गळाभेट घेतल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याची गरज व्यक्त केली होती. यावर राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य करत, ‘ट्रम्प यांची आणखी एक गळाभेट घेण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदींवर टीका केली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस