शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

हादियाचे वडील म्हणतात, ती पुन्हा शिक्षण घेणार याचा मला आनंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 8:44 PM

केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून....

नवी दिल्ली : केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. सेलमच्या कॉलेजने हादियाला प्रवेश देऊन तिची तेथे होस्टेलवर राहण्याची व्यवस्था करावी आणि केरळ सरकारने तिला तेथे सुरक्षितपणे नेऊन पोहोचवावे, असा आदेश सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. शिकत असताना हादियाच्या पालकत्वाची जबाबदारी कॉलेजच्या अधिष्ठात्यांवर सोपविली आहे. हिंदू अखिलाने शफीन जहाँ या मुस्लीम तरुणाशी धर्मांतर करून प्रेमविवाह केला. मात्र तिला फितवून मुसलमान केले गेले व तिच्याशी विवाह केला गेला, अशी तक्रार करत तिच्या वडिलांनी याचिका केल्यावर केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्दबातल केला होता. त्याविरुद्ध तिच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. 

काय आहे प्रकरण?केरळमध्ये राहणाऱ्या शफीन जहानने डिसेंबर महिन्यात एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. हादिया असे त्या महिलेचे नाव असून धर्मांतर केल्यानंतर तिने शफीनशी विवाह केला होता. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. तर एनआयएनेही या प्रकरणात अहवाल दिला होता. केरळमध्ये एक यंत्रणा सुनियोजित पद्धतीने काम करत आहे, ती समाजाचे मतांतर करुन त्यांना कट्टर बनवण्याचे काम करत असून अशा प्रकारची ८९ प्रकरणे उघडकीस आल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले होते. केरळ हायकोर्टाने हा विवाह रद्द ठरवला होता.