शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:26 IST

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.

ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होताआता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरूदहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. या कारवाईत खरंच दहशतवादी मारले गेले आहेत का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येऊ लागला आहे. आता काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनीही एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्रीय मंत्री एसएस अहलुवालिया यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत, दहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये 250 हून अधिक दहशतवादी मारले गेले, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर यासंदर्भातील वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान एअर स्ट्राइकचा उद्देश पाकिस्तानला इशारा देण्याचा होता, मारण्याचा नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी केले होते. तो धागा पकडत सिद्धू म्हणाले की, दहशतवाद्यांना मारायचे नव्हते तर कारवाईचा हेतू काय होता. दहशतवाद्यांना मारायला नाही तर काय झाडं पाडायलया गेला होता काय? ही निवडणुकीसाठीची स्टंटबाजी आहे का?'' ''300 दहशतवादी ठार झाले आहेत की नाही. सध्या सुरू असलेले लष्करावरील राजकारण बंद झाले पाहिजे.''असेही सिद्धू म्हणाले.  दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसBJPभाजपा