"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 08:08 IST2025-09-24T08:05:16+5:302025-09-24T08:08:41+5:30
मंगळवारी एका संसदीय समितीने अमेरिकेने भारताविरुद्ध घेतलेल्या अलिकडच्या प्रतिकूल निर्णयांचा मुद्दा अमेरिकन कायदेकर्त्यांच्या शिष्टमंडळासमोर उपस्थित केला आणि या घडामोडींवर भारतीय-अमेरिकन समुदायाचे मौन देखील चर्चेदरम्यान उपस्थित झाले.

"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धोरणात मोठा बदल केला आहे. H-1B व्हिसासाठी आता ८८ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. यावरून आता जगभरात चर्चा सुरू आहेत. अमेरिकेत या व्हिसावर राहणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या आहे. यामुळे या धोरणाचा भारतीयांवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, आता या धोरणावर खासदार शशी थरुर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. खासदार थरुर यांनी अमेरिकन भारतीयांनी या धोरणाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. "अमेरिकेतील धोरण बदलावर भारतीय-अमेरिकन समुदायाची ‘मौनता’ ‘आश्चर्यकारक’ आहे; त्यांना पुढे येऊन या बदलांविरुद्ध आवाज उठवावा",असंही खादार थरुर म्हणाले.
मंगळवारी एका संसदीय समितीने अमेरिकेने भारताविरुद्ध घेतलेल्या अलिकडच्या प्रतिकूल निर्णयांचा मुद्दा अमेरिकन कायदेकर्त्यांच्या शिष्टमंडळासमोर उपस्थित केला आणि या घडामोडींवर भारतीय-अमेरिकन समुदायाचे मौन देखील चर्चेदरम्यान उपस्थित झाले.
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी बैठकीनंतर सांगितले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रतिनिधी असलेल्या पॅनेल सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे भारतीय-अमेरिकन समुदाय "या सर्व गोष्टींवर इतके मौन का आहेत." भारतीय वंशाच्या अमी बेरा यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन शिष्टमंडळातील काही सदस्यांनीही या मताचे समर्थन केले.
'एकाही भारतीय-अमेरिकन मतदाराकडून एकही फोन कॉल नाही : थरुर
थरूर म्हणाले, "आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे भारतीय-अमेरिकन समुदाय या सर्वांवर इतका मौन का बाळगून आहे हे मी अधोरेखित करू इच्छितो. काँग्रेसच्या एका सदस्याने सांगितले की त्यांच्या कार्यालयाला कोणत्याही भारतीय-अमेरिकन मतदाराकडून धोरण बदलाला पाठिंबा देण्यास सांगितलेला एकही फोन कॉल आलेला नाही. हे आश्चर्यकारक आहे."
थरूर म्हणाले, "तुम्हाला त्यासाठी लढावे लागेल आणि बोलावे लागेल
"आपण सर्वांनी भारतीय-अमेरिकन लोकसंख्येपर्यंत पोहोचून त्यांना सांगावे की जर त्यांना मातृभूमीशी असलेल्या त्यांच्या नात्याची काळजी असेल तर त्यांनी लढावे आणि त्यासाठी बोलावे आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधींना भारताच्या बाजूने उभे राहण्यासाठी दबाव आणावा. भेट देणारे अमेरिकन कायदेकर्त्यांचे भारताचे मित्र आहेत आणि त्यांचे देशाबद्दल चांगले विचार आहेत",असंही थरुर म्हणाले.