'शिवलिंग सापडलेली जागा तात्काळ सील करा', वाराणसी कोर्टाचे आदेश; वजु करण्यावरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 01:14 PM2022-05-16T13:14:59+5:302022-05-16T14:10:16+5:30

Gyanvapi Masjid Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान मोठ्या आकाराचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या बाजूने केला जात आहे.

Gyanvapi Masjid Survey: 'Seal the place immediately where Shivling was found', Varanasi court order | 'शिवलिंग सापडलेली जागा तात्काळ सील करा', वाराणसी कोर्टाचे आदेश; वजु करण्यावरही बंदी

'शिवलिंग सापडलेली जागा तात्काळ सील करा', वाराणसी कोर्टाचे आदेश; वजु करण्यावरही बंदी

googlenewsNext


Gyanvapi Masjid Survey:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसीन्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आदेश दिले की, ज्या ठिकाणी शिवलिंग प्राप्त झाले आहे ती जागा तातडीने सील करावी आणि कोणत्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे.

न्यायालयाने अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारीही निश्चित केली आहे. वाराणसी कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंट यांना आदेश देण्यात आला आहे की, वरील सर्व अधिकारी सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. याचा विचार केला जाईल.

शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला 
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण संपले होते, पण शिवलिंग सापडल्याच्या दाव्यांवरुन आता वादळ उठले आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून टीम बाहेर पडताच हिंदू पक्षांनी शिवलिंग मिळाल्याचा दावा सुरू केला. हिंदूंच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या आवारातील विहिरीत 12.8 फूट व्यासाचे शिवलिंग सापडले आहे.

मुस्लिम पक्षाने हा दावा फेटाळून लावला
शिवलिंगाच्या दाव्यावर मुस्लिम पक्षाने खंडन केले आहे. मुस्लिम बाजूचा दावा आहे की, आत काहीही सापडले नाही. दरम्यान, न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत शिवलिंग प्रकरणावर मौन पाळले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार वजूवर बंदी
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग मिळण्यानंतर कोर्टाने तो परिसर सील केला आहे. तसेच, कोर्टाच्या आदेशानुसार, या परिसरात वजु करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

Web Title: Gyanvapi Masjid Survey: 'Seal the place immediately where Shivling was found', Varanasi court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.