ज्ञानवापी प्रकरण: खटला सुनावणी याेग्य आहे का? गुरुवारी सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 07:12 IST2022-05-25T07:11:21+5:302022-05-25T07:12:35+5:30
कोर्ट : पुढील सुनावणी हाेणार गुरुवारी

ज्ञानवापी प्रकरण: खटला सुनावणी याेग्य आहे का? गुरुवारी सुनावणी होणार
वाराणसी : ज्ञानवापी परिसरात झालेल्या सर्वेक्षणाबाबत दाेन्ही पक्षकारांना आक्षेप नाेंदविण्यासाठी जिल्हा न्यायालयाने एका आठवड्याचा वेळ दिला असून, पुढील सुनावणी २६ मे राेजी हाेणार आहे. जिल्हा न्यायालयाचे न्या. ए. के. विश्वेश यांच्यासमाेर याप्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी वकील राणा संजीव सिंह यांनी सांगितले की, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. खटला चालविण्यायाेग्य आहे की नाही, याबाबत २६ मे राेजी पुढील सुनावणी हाेणार आहे.
अंजुमन इंतजामिया मसाजिद समितीने हा खटला चालविण्यायाेग्यच नसल्याचा दावा केला हाेता. १९९१ च्या प्रार्थना स्थळ अधिनियमावर सर्वप्रथम सुनावणी व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे हाेते. त्यावरच ही सुनावणी हाेणार आहे. न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणातील छायाचित्रे, व्हीडिओ, सीडी आदी दाेन्ही पक्षांना देण्याचेही म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
केवळ ३६ जणांना परवानगी
मंगळवारच्या सुनावणीदरम्यान काेर्ट रूममध्ये केवळ ३६ जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली हाेती. खटल्याची संवेदनशीलता पाहता, न्यायालयाच्या सुरक्षेत माेठी वाढ करण्यात आली असून, सकाळी अनावश्यक लाेकांना प्रवेश बंदी करण्यात आली हाेती.