शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Jinnah Tower: जिन्ना टॉवर वाद! वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टॉवरला मारला तिरंगा रंग; नाव बदलण्यावर भाजप ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:02 IST

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात असलेल्या एका मिनाराला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांचे नाव देण्यात आले आहे. भाजपने हे नाव बदलून एपीजे एब्दुल कलामांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

गुंटूर:आंध्र प्रदेशातीलगुंटूर येथील वादग्रस्त जिन्ना टॉवरला अखेर तिरंगा रंगात रंगवण्यात आले आहे. तसेच, गुरुवारी या टॉवरजवळ राष्ट्रध्वज फडकवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गुंटूर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची आठवण करुन देणाऱ्या टॉवरचे नाव बदलण्यात यावे, असा पवित्रा भाजपने घेतला आहे.

गुंटूर शहराच्या महापौर कवेती मनोहर यांनी टॉवरच्या नावावरुन राजकारण करत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही आठवड्यांपासून भाजपचे कार्यकर्ते या टॉवरबाबत विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आम्ही परिसरातील मुस्लिम ज्येष्ठांशी बोललो असून टॉवरशेजारी राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ टॉवरचा रंग बदलून आम्ही शांत होणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

टॉवरला एपीजे अब्दुल कलामांचे नाव द्याआंध्र प्रदेश भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, जिन्ना टॉवरचे नाव बदलेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. बुरुज तिरंग्याच्या रंगात रंगला, हे ठीक आहे पण त्याचे नावही बदलले पाहिजे. जिन्ना हे पाकिस्तानचे संस्थापक आहेत आणि ते भारताच्या दडपशाहीचे प्रतीक होते. जिन्ना आणि औरंगजेब यांच्यात काही फरक नाही. ज्याप्रमाणे औरंगजेब रोडचे नामकरण करण्यात आले, त्याचप्रमाणे या जिन्ना टॉवरचे नामकरण एपीजे अब्दुल कलाम टॉवर असे करण्यात यावे, असे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण ?आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. या टॉवरच्या नामांत्तराचा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तात्काळ जिन्ना टॉवरचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्या टॉवरला द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. 

टॉवरचा इतिहास?असे म्हटले जाते की, स्वातंत्र्य काळापासून गुंटूर शहरात हे टॉवर उभे आहे. 1945 मध्ये फाळणीपूर्वी मोहम्मद अली जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. त्यावेळी काही स्थानिक मुस्लिमांनी त्यांना भेट देण्याच्या उद्देशाने या टॉवरचे नाव जिन्ना यांच्या नावावर ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक या टॉवरला सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. या परिसराला सध्या जिन्ना सेंटर म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशguntur-pcगुंटूरBJPभाजपा