खडसेंनी चौकशांऐवजी शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा गुलाबराव पाटील : १३ रोजीचा मोर्चा निघणार, १० हजार शेतकर्यांचा सहभाग
By Admin | Updated: May 8, 2016 23:08 IST2016-05-08T23:08:33+5:302016-05-08T23:08:33+5:30
जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्यांनी केळी कर्ज घेतले ते आपल्या जमिनी तारण करून, त्यांनी खडसे यांच्यासारखे पॉलीहाऊसचे अनुदान घेतले नाही, असे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

खडसेंनी चौकशांऐवजी शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा गुलाबराव पाटील : १३ रोजीचा मोर्चा निघणार, १० हजार शेतकर्यांचा सहभाग
ज गाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्यांनी केळी कर्ज घेतले ते आपल्या जमिनी तारण करून, त्यांनी खडसे यांच्यासारखे पॉलीहाऊसचे अनुदान घेतले नाही, असे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. जिल्ात शेतकरी त्राहीमाम करीत आहे. गिरणा पा उजाड झाला. ज्या शेतकर्यांनी कसेबसे कर्ज भरले त्यांना विविध कार्यकारी सोसायट्यांकडून कर्ज अजूनही मिळालेले नाही. अनेक शेतकरी पैशांअभावी अडचणीत सापडले आहेत. आता कांदा उत्पादकही चुकीच्या शेती धोरणामुळे आत्महत्या करीत आहेत. यावल तालुक्यात किनगाव खुर्द येथे अशा कांदा उत्पादकाने चुकीच्या कृषि धोरणांवर बोट ठेवून आपले जीवन संपविले. पण कृषि विभाग, मंत्री या शेतकर्याकडे गेले का हा मुद्दा आहे. ज्या बळीराजाने यांना मोठं केलं त्या बळीराजाच्या कर्जांची चौकशी करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकर्यांना वेठीस धरण्याऐवजी दुष्काळी स्थितीत त्यांना तातडीने मदतीचा हात द्यावा. अजून मागील हंगामाचे बागायती पिकांचे अनुदान आले नाही. यंत्रणा फक्त आपल्यापुरतीच राबविण्याचा प्रकार या स्थितीत करणे शेती व शेतकरी यांच्या हिताचे नाही. शेतकरी या प्रकाराचे उत्तर योग्य वेळ आल्यानंतर देतीलच. कितीही धमक्या आल्या तरी बळीराजासाठी माघार घेतली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेतर्फे बळीराजाच्या मागण्यांसाठी १३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यात १० हजारांवर शेतकरी सहभागी होतील, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.