कच्छ - गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भचाऊजवळ काल रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले कुटुंबीय एसयूव्हीमधून प्रवास करत होते. दरम्यान, त्यांचे वाहन दोन ट्रकांच्या मध्ये आल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल रात्री भचाऊ महामार्गावर हा अपघात झाला. मिठाने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात एसयूव्हीला धडकला. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनेही एसयूव्हीला धडक दिली. या भीषण अपघातात एसयूव्हीमधील दहा जणांचा मृत्यू झाला.
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 08:51 IST
मिठाने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात एसयूव्हीला धडकल्याने झाला अपघात
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू
ठळक मुद्देगुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भचाऊजवळ काल झाला भीषण अपघातमिठाने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात एसयूव्हीला धडकलाअपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू