'तो' वेग बेतला जीवावर! काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा Video आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:59 IST2024-09-26T15:57:05+5:302024-09-26T15:59:20+5:30
गुजरातमधील साबरकांठा येथे झालेला रस्ता अपघात हा वेगामुळे झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून आता हे उघड झालं आहे.

'तो' वेग बेतला जीवावर! काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा Video आला समोर
गुजरातमधील साबरकांठा येथे झालेला रस्ता अपघात हा वेगामुळे झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून आता हे उघड झालं आहे. या व्हिडिओमध्ये, कारमधील सर्व लोक कशी मस्ती करत आहेत आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकत आहेत, हे दिसत आहे. त्याच दरम्यान त्यांची कार हायवेवर १२० च्या वेगाने जात आहे, हा कारमधील सर्व लोकांचा शेवटचा व्हिडीओ असल्याचे सिद्ध झालं.
अपघातात कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेपूर्वी भारत केसवाणी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केला होता. या अपघातात भरत केसवाणी यांचाही मृत्यू झाला. या व्हिडीओमध्ये कारच्या आत बसलेले सर्व लोक गाडीच्या वेगाचा आनंद घेत गाताना दिसत आहेत.
#मौत से चंद सेकेंड पहले का Video. #साबरकांठा के #हिम्मतनगर में कल हुए हादसे में सात लोगों की मौके पर मौत हुई..इस कार का एक वीडियो सामने आया.भरत केसवाणी ने अपने व्हाट्सएप स्टेटस में वीडियो डाला था.हिम्मतनगर के सहकारी जीन के पास इनोवा कार ट्रेलर के पीछे घुसने से हादसा हुआ था.. pic.twitter.com/sZivPF8nH3
— Vinit Tyagi(Journalist) (@tyagivinit7) September 26, 2024
कारमधील सर्व लोक परदेशातून आलेल्या त्यांच्या मित्रासोबत राजस्थानला फिरायला जात होते, असे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान त्यांची गाडी हिंमतनगर जवळ आली असता मोठा अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.