सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:18 IST2025-12-14T08:18:14+5:302025-12-14T08:18:42+5:30
Gujarat Crime News: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पडलिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शनिवारी दुपारी सर्व्हे करण्यासाठी आलेले वन आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांवर सुमारे ५०० जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात ४७ अधिकारी जखमी झाले.

सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पडलिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शनिवारी दुपारी सर्व्हे करण्यासाठी आलेले वन आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांवर सुमारे ५०० जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात ४७ अधिकारी जखमी झाले.
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या अधिकाऱ्यांपैकी ३६ जणांना उपचारांसाठी अंबाजी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ११ अधिकाऱ्यांना पुढील उपचारांसाठी पालनपूर सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, जमावाने हा हल्ला का केला, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी दुपारी सुमारे २.३०च्या दरम्यान पोलीस, वनविभाग आणि महसूल विभागाची संयुक्त टीम वनविभागाच्या सर्व्हे क्रमांक ९ क्षेत्रामध्ये नर्सरी आणि वृक्षारोपणाचं काम करत असताना घडली. काम सुरू असताना सुमारे ५०० लोकांच्या जमावाने दगडफेक सुरू केली. तसेच धनुष्यबाणांचा वापरही हल्ला करण्यासाठी केला. हा परिसर दांता तालुक्यामध्ये आहे. तो अंबाजी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून सुमारे १४ किमी अंतरावर आहे.