शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भीषण, भयंकर, भयावह! मृतांचा आकडा इतका की स्मशानातही वेटिंग, कब्रस्तानातही मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:05 IST

भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोरबी पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले. 

भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. शहरातील चार कब्रस्तान आणि सातही स्मशानांत असंच चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांकडे सोपवले. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी गर्दी झाली होती. शहरातल्या 4 कब्रस्तानमध्ये कबर खोदण्यासाठी वेळ लागत आहे. 

“काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं?

7 स्मशानांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती होती. काही ठिकाणी चिता रचण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. शहरातल्या 4 कब्रस्तानात कबरी खोदण्यासाठी 150 जण आहेत. कबरी खोदण्याचं काम दिवसरात्र सुरूच होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या दुर्घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी भाऊ, तर कोणी आई-बाबा... अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका लहान मुलाचा बूट हा नदी किनारी पडलेला सापडला तर गर्भवती महिलेचा मृतदेह पाहून देखील अनेकांच्या अंगावर काटा आला. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. 

हृदयद्रावक! कोणी भाऊ गमावला तर कोणी आई-बाबा; घरातून 8 जण निघाले पण 'ती' एकटीच परतली

जमीला या महिलेने देखील या पूल दुर्घटनेत आपली जवळची माणसं गमावली आहेत. जमीला आपल्या कुटुंबातील आठ जणांसोबत पूल पाहण्यासाठी गेली होती. पण पूल कोसळला आणि सर्वच संपलं. तिच्या कुटुंबातील सात जण तिने गमावली असून ती एकटीच वाचली आहे. जमीलाने दिलेल्या माहितीनुसार, "माझी नणंद दिवाळीच्या सुट्टीसाठी येथे आली होती. नणंद आणि तिची दोन मुलं. तसेच माझे पती आणि मुलांसह बाहेर गेली होती. माझे पती आम्हाला पूल पाहायला घेऊन गेले होते. पण या दुर्घटनेत मी सात जण गमावले आणि एकटीच परत आली आहे." अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरबी येथे राहणारे हार्दिक फलदू हे आपली पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा जियांश याला घेऊन पूल पाहण्यासाठी गेले होते. पूल कोसळल्याने हार्दिक आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर जियांशला वाचवण्यात यश आलं. पण आता त्याच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र मात्र कायमचं गेलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलDeathमृत्यू