Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:14 IST2025-12-12T13:13:57+5:302025-12-12T13:14:55+5:30
Gujarat Flyover Accident: गुजरातमधील वलसाडमध्ये पूल उभारणीचे काम सुरू असताना दुर्घटना घडली. यात चार कामगार गंभीर जखमी झाले असून, १ जण बेपत्ता आहे.

Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
गुजरातमधील वलसाडमध्ये शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. कैलाश रोडवर औरंगा नदी वर उभारण्यात येत असलेल्या पूलाच्या कामादरम्यान पूलाचा मलबा कोसळला. सकाळी ९ वाजता ही घटना घडली असून, जेव्हा गर्डर कोसळला तेव्हा कामगार दोन खांबांच्यामध्ये काम करत होते.
वलसाडमध्ये पूलाचा गर्डर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये ४ कामगार जखमी झाले आहेत. एक कामगार अजूनही ढिगाराखाली दबल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुजरात -
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 12, 2025
वलसाड में औरंगा नदी पर बन रहा पुल गिरा। करीब 4-5 मजदूरों के घायल होने की सूचना। हादसे के वक्त साइट पर करीब 105 मजदूर काम कर रहे थे। एक गर्डर डैमेज होने से पुल गिरने की बात सामने आ रही है। pic.twitter.com/HtABP6AL7H
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पूलाचा एक भाग अचानक ढासळला आणि खाली काम करत असलेल्या कामगारांवर स्लॅब आणि लोखंडी सळई कोसळल्या. ही घटना घडल्यानंतर धावपळ उडाली. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत गर्डरचे नुकसान झाले आहे.