Arvind Kejriwal: मोफत वीज वाटपाचं लोण गुजरातपर्यंत; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 03:00 PM2022-07-21T15:00:08+5:302022-07-21T15:01:28+5:30

पंतप्रधान मोदींचा आणि भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या गुजरातवर 'आप'ची नजर

Gujarat Elections 2022 AAP CM Arvind Kejriwal promises free electricity Pm Modi  | Arvind Kejriwal: मोफत वीज वाटपाचं लोण गुजरातपर्यंत; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

Arvind Kejriwal: मोफत वीज वाटपाचं लोण गुजरातपर्यंत; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

Next

Arvind Kejriwal Gujarat Elections: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गुजरात दौऱ्यावर आलेल्या केजरीवाल यांनी आता गुजरातला बदल हवा असल्याचं म्हटलं आहे. ते गुजरातमध्येही मोफत वीज देणार आहेत. गुजरातमध्ये 24 तास वीज मिळावी यासाठी आपला प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. अरविंद केजरीवाल आपल्या दौऱ्यावर गुजरातमधील सुरत येथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली.

"गुजरातमध्ये सर्वांची दिशाभूल करण्यात येत आहे. 27 वर्षे एकाच पक्षाने इथे राज्य केले. त्यामुळे त्यांच्यात अहंकार निर्माण झाला आहे. आता गुजरातला बदल हवा आहे. महागाई वाढत आहे, विजेचे दर वाढत आहेत. दिल्ली नंतर पंजाबमध्ये वीजपुरवठा मोफत करण्यात आला आहे. आता गुजरातमध्येही वीज मोफत देण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला राजकारण कसे करावे हे कळत नाही. हा प्रामाणिक लोकांचा पक्ष आहे. काम नाही केले तर मतदान करू नका. आमचे सरकार आल्यास तीन महिन्यांत ३०० युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाईल", असं आपचे प्रमुख अरविदं केजरीवाल वाटले.

"दिल्ली, पंजाबमध्ये मोफत वीज मिळत असेल, तर गुजरातमध्येही मिळेल. २४ तास वीज मिळेल, वीजपुरवठा खंडित होणार नाही. मी बोलतोय ते तुम्हाला जादू करण्यासारखं वाटत असेल तर चिंता करू नका. ही जादू कशी करायची हे इतर कोणालाही माहीत नाही. अनेक पक्ष निवडणुकीपूर्वी येतात आणि म्हणतात की आमच्याकडे "संकल्प पत्र" आहे. 15 लाख देण्याचे आश्वासन देतात. पण निवडणुकीनंतर तुम्ही त्यांना याबद्दल विचारल तर तेव्हा ते म्हणतात की हा जुमला होता. पण आम्ही निवडणुकीत नौटंकी करत नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो. जनतेमध्ये मोफत वाटल्या जाणार्‍या रेवडीला देवाचा प्रसाद म्हणतात. सरकारी लोकांच्या मित्रांना आणि मंत्र्यांना मोफत की रेवडी वाटणे हे पाप आहे. त्यापेक्षा जनतेचा फायदा होईल असं धोरण ठेवा", अशा शब्दांत केजरीवालांनी भाजपावर जोरदार टीका केली.

Web Title: Gujarat Elections 2022 AAP CM Arvind Kejriwal promises free electricity Pm Modi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.