चाणक्य EXIT POLL: गुजरातमध्ये कॉंग्रेसचं पाणीपत , भाजपाला 135 हून जास्त जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 05:53 PM2017-12-14T17:53:28+5:302017-12-14T19:16:30+5:30

गुजरात विधानसभा निवडणूकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर आता हिमाचल प्रदेशसह दोन्ही राज्यांचे विविध न्यूज चॅनलने केलेले एक्झिट पोल समोर यायला सुरूवात झाली आहे.

Gujarat Election: What is the meaning of Chanakya EXIT POLL? | चाणक्य EXIT POLL: गुजरातमध्ये कॉंग्रेसचं पाणीपत , भाजपाला 135 हून जास्त जागा

चाणक्य EXIT POLL: गुजरातमध्ये कॉंग्रेसचं पाणीपत , भाजपाला 135 हून जास्त जागा

Next

मुंबई: आज गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान झालं. यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं. गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण गुजरात विधानसभा निवडणूकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर आता हिमाचल प्रदेशसह दोन्ही राज्यांचे विविध न्यूज चॅनलने केलेले एक्झिट पोल समोर यायला सुरूवात झाली आहे. टुडेज चाणक्य-न्यूज 24 चा एक्झिट पोल देखील समोर आला असून यानुसार भाजपा कॉंग्रेसमध्ये एकहाती सत्ता स्थापन करेल, त्याहून महत्वाचं म्हणजे कॉंग्रेसचं या निवडणुकीत पाणीपत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

चाणक्यचा एक्झिट पोल -

भाजपाला 135 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) कॉंग्रेसला 47 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 0 ते 3 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 



 

हिमाचलमध्ये झालेल्या निवडणुकांबाबतही चाणक्यचा पोल आला असून यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 68 जागांपैकी भाजपाला 55 जागा ( 7 जागा कमी किंवा जास्त ), कॉंग्रेसला 13 जागा (7 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 3 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 



2014 च्या लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आलेल्या विविध एक्झीट पोलपैकी फक्त चाणक्यचा एक्झीट पोल सर्वात जवळ ठरला होता. एनडीएला 340 जागा मिळतील असा अंदाज सर्वात पहिले केवळ चाणक्यने वर्तवला होता. याच वर्षी उत्तर प्रदेश निवडणुकांचा अंदाज देखील चाणक्यच्या पोलचा खरा ठरला होता. उत्तर प्रदेशमध्ये चार एक्झिट पोल्सनी भाजपा उत्तरप्रदेशात सर्वात मोठा पक्ष ठरेल पण उत्तरप्रदेश विधानसभा त्रिशंकू राहील असा अंदाज व्यक्त केला होता, पण भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असं चाणक्यने आपल्या पोलमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे चाणक्यच्या पोलकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.  

Web Title: Gujarat Election: What is the meaning of Chanakya EXIT POLL?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.