Gujarat Election : रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा वाचून विस्फारतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:32 IST2022-11-17T06:32:20+5:302022-11-17T06:32:20+5:30

Ravindra Jadeja's wife : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांची संपत्ती समोर आली आहे.

Gujarat Election: Billions of wealth in the name of Ravindra Jadeja's wife, eyes will widen after reading the figure | Gujarat Election : रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा वाचून विस्फारतील डोळे

Gujarat Election : रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा वाचून विस्फारतील डोळे

अहमदाबाद : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांची संपत्ती समोर आली आहे.
रिवाबा व्यावसायिक आहेत. त्यांचा फूड बिझनेस आहे. त्यांच्याकडे दागदागिने, घर, गाडी व अन्य गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे. ७० कोटी ४८ लाख रुपयांची संपत्ती ही रवींद्र जडेजाच्या नावे आहे. तर ६४.३ कोटींची संपत्ती रिवाबा जडेजा यांच्या नावे आहे. रिवाबा व रवींद्र यांच्याकडे अनुक्रमे ५७.६० व ३७.४७ कोटी किमतीची प्रॉपर्टी गुंतवणूक आहे. 

१ कोटींचे दागिने...
रिवाबाकडे १ कोटी रुपयांचे दागिने आहेत. यात सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत. रवींद्र जडेजाकडे तीन लक्झरी कार आहेत. यात फोक्सवॅगन पोलो जीटी, फोर्ड एन्डेव्हर व ऑडीचा समावेश आहे. रिवाबा यांच्या नावे अहमदाबाद, राजकोट, जामनगर येथे एकूण ६ घरे व राजकोट व जामनगर येथील दुकानांचे गाळे आहेत.

Web Title: Gujarat Election: Billions of wealth in the name of Ravindra Jadeja's wife, eyes will widen after reading the figure

टॅग्स :Gujaratगुजरात