गुजरात निवडणूक - खून, बलात्काराचा आरोप असलेले 330 जण मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 08:21 IST2022-12-01T08:20:43+5:302022-12-01T08:21:41+5:30
३३० उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

गुजरात निवडणूक - खून, बलात्काराचा आरोप असलेले 330 जण मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून, एकूण १६२१ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी २० टक्के म्हणजेच ३३० उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
कोणाच्या किती गुन्हे
आप - ६१, काँग्रेस ६०, भाजप ३२
१९२ उमेदवारांवर खून, खुनाचा प्रयत्न व बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत.
९६ उमेदवार गंभीर गुन्हे असलेले ते काँग्रेस, भाजप, आपचे आहेत.