शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
4
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
5
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
6
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
7
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
8
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
9
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
10
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
11
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
12
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
13
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
14
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
15
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
16
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
17
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
18
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
19
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
20
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: “आदिवासींचा विकास करण्यास भाजपच सक्षम”; टीका करत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 10:44 IST

Gujarat Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीमुळे प्रभावित असून, केवळ विचारधारेमुळे काँग्रेसमध्ये होतो, असे या नेत्याने म्हटले आहे.

गांधीनगर: आताच्या घडीला देशातील वातावरण अनेकविध कारणांवरून तापताना पाहायला मिळत आहे. अशातच गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Gujarat Election 2022) सर्व राजकीय पक्षांनी हळूहळू मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पाच राज्यांतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसला एकावर एक धक्के बसत आहेत. हार्दिक पटेल यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलेला असतानाच काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदिवासी समाजाचा विकास करण्यास केवळ भाजप सक्षम असल्याचे या नेत्याने म्हटले आहे.  काँग्रेसमधील एक मोठे नाव आणि दमदार नेते म्हणून ओळख असलेल्या अश्विन कोतवाल यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आदिवासी समाजावर अश्विन कोतवाल यांची मजबूत पकड असल्याचे बोलले जाते. खेडब्रह्मा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. अश्विन कोतवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद न मिळाल्यामुळे अश्विन कोतवाल काँग्रेसवर नाराज होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा प्रभाव

सन २००७ पासून काँग्रेस आमदार म्हणून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून त्यांचे काम, त्यांची कार्यशैली मी जवळून पाहिली आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच माझ्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, केवळ विचारधारेमुळे मी काँग्रेसमध्ये आजपर्यंत राहिलो. मला माझ्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समूहाचा विकास करायचा आहे. त्यांच्यासाठी चांगले काम करायचे आहे. आदिवासी समाजाचा विकास करण्यास केवळ भाजपच सक्षम आहे आणि म्हणूनच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे अश्विन कोतवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, पाटिदार आंदोलनामुळे चर्चेत आलेले हार्दिक पटेलकाँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मात्र आता त्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढला आहे. आता त्यांच्या बायोमध्ये 'देशभक्त, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता,' असा उल्लेख आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस सोडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाGujaratगुजरातElectionनिवडणूक