शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
11
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
12
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
13
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
14
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
15
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
16
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
17
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
18
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
19
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
20
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला

चाकूने पोट फाडले, आतडे बाहेर काढले आणि..., आईच्या प्रियकराचा मुलांनी केला निर्घृण हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:34 IST

Gujarat Crime News: अनैतिक संबंधांमधून मुलांनी आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील गांधीनगर येथे घडली आहे. येथे दोन भावांनी त्यांच्या आईच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे आतडे बाहेर काढून हवेत भिरकावले.

अनैतिक संबंधांमधून मुलांनी आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील गांधीनगर येथे घडली आहे. येथे दोन भावांनी त्यांच्या आईच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे आतडे बाहेर काढून हवेत भिरकावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना संतापून मुलांनी या व्यक्तीची हत्या केली. मृत रतनजी ठाकोर याचे आरोपी भावांच्या विधवा आईसोबत मागच्या १५ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब या दोघांनाही खटकत होती. या संबंधांमुळे आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींचा अपमान होत असल्याचं आणि कुटुंबाला लाजिरवाणं व्हावं लागत असल्याचं आरोपींना वाटत होतं. त्यामधूनच संतापून आरोपींनी टोकाचं पाऊल उचलत ठाकोर याचा खून केला.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यामध्ये २६ जानेवारी रोजी घडली. आरोपी संजय ठाकोर (२७) आणि जयेश ठाकोर (२३) यांनी रतनजी ठाकोर याच्यावर दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी त्याच्या पोटामध्ये चाकू भोसकून मृताचे आतडे बाहेर काढले. मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. 

आरोपींनी पीडिताचे आतडे बाहेर काढले. तसेच ते हवेमध्ये भिरकावून कापून टाकले. हा क्रूर प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हादरले. दरम्यान, काही कामगारांनी मृत रतनजी ठाकोर याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही.  

पेशाने गवंडी असणारा मृत रतनजी ठाकोर याचे आरोपींच्या आईसोबत अनेक वर्षांपासून प्रेमप्रकऱण सुरू होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संबंधांमुळे कुटुंबांना शरमेने मान खाली घालावी लागत असल्याने दोन्ही भावांना हे संबंध मान्य नव्हते. दरम्यान, मयत रतनजी ठाकोरचा मुलगा अजय याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, आरोपींनी माझ्या वडिलांना त्यांच्या आईपासून लांब राहण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांचं या विषयावरून माझ्या वडिलांसोबत अनेकदा भांडणही झालं होतं.  दरम्यान, या प्रकरणी आधी गावात पंचायतही बोलावण्यात आली होती. मात्र त्यामधून कुठलाही तोडगा निघाला नव्हता. रतनजी ठाकोर याची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी त्यांना शोधून काढले आणि अटक केली. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारेही ताब्यात घेण्यात आली असून, आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातFamilyपरिवार