Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:45 IST2025-10-17T12:44:03+5:302025-10-17T12:45:22+5:30
Gujarat Cabinet Minister List 2025: २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपने गुजरात सरकारमध्ये मोठा फेरबदल केला आहे.

Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी
Gujarat Cabinet Expansion Live: भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातमध्ये मोठा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्रीभूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर १९ नवीन चेहऱ्यांसह २६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपने सामाजिक समीकरणाची विशेष काळजी घेतली असून, तीन महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्रीभूपेंद्र पटेल यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात कोण असेल, हेही स्पष्ट झाले आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आमदार रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्री केले आहे.
भूपेंद्र पटेल यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांना वगळण्यात आले असून, फक्त ६ जणांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
गुजरात मंत्रिमंडळ विस्तार : सर्व मंत्र्यांची यादी
भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री
त्रिकम बीजल चांगा
स्वरुपजी ठाकोर
प्रत्रवणकुमार गोर्धनजी माळी
ऋतिकेश गणेशभाई पटेल
पीसी बराडा
दर्शना एम. वाघेला
कांतीलाल शिवलाल अमृतिया
वरजीभाई मोहनभाई बावलिया
रिवाबा जडेजा
अर्जून मोढवाडिया
डॉ. प्रद्यमन वाजा
कौशिक कांतीभाई वेकरिया
परशोत्तम सोलंकी
जितेंद्रभाई सावजीभाई वाघाणी
रमणभाई भीखाभाई सोलंकी
कमलेशभाई रमेशभाई पटेल
संजय सिंह महेदा
रमेशभाई भूराभाई कटारा
मनीषा राजीवभाई वकील
ईश्वर सिंह ठाकोरभाई पटेल
प्रफुल पानसेरिया
हर्ष सांघवी
जयारामभाई गामित
नरेशभाई पटेल
कनुभाई देसाई
भूपेंद्र पटेल यांचे तिसरे मंत्रिमंडळ
भूपेंद्र पटेल सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. तेव्हा विजय रुपाणी यांना अचानक हटवण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळाले आणि भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले. त्यांचे हे तिसरे मंत्रिमंडळ असणार आहे.