शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आमचं ऐकत नाही; भाजपा आमदाराचा थेट राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 21:40 IST

भाजपा आमदार म्हणतो, माझ्या राजीनाम्याला सरकार आणि सरकारी कर्मचारी जबाबदार

अहमदाबाद: गुजरातचे भाजपाआमदार केतन इनामदार यांनी राजीनामा दिला आहे. इनामदार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. आपल्या राजीनाम्यासाठी त्यांनी रुपाणी सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारकडून आपलं म्हणणं ऐकलं जात नाही, असा आरोप इनामदार यांनी केला आहे. 'माझ्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मी सरकार आणि प्रशासनासमोर ठेवल्या. मात्र सरकार आणि सरकारी बाबूंनी वेळकाढूपणा केला. सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवत नाहीत. यामुळेच मी आमदारकीचा राजीनामा देत आहे,' असं इनामदार यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केलं आहे. इनामदारांच्या राजीनाम्यामुळे भाजपाचं विधानसभेतलं संख्याबळ १०३ वरुन १०२ वर आलं आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेची निवडणूक होण्याआधी गुजरातमध्ये भाजपाला इनामदार यांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला आहे. आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन, असं इनामदार यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसनं इनामदार यांना स्वत:कडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या निवडणुकीत इनामदार सावली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.  इनामदार यांच्या राजीनाम्यानंतर गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी भाजपाला लक्ष्य केलं. गुजरातमधील भाजपा सरकारवर जनताच नव्हे, तर त्यांचे आमदारदेखील नाराज आहेत. त्यामुळेच सावलीचे आमदार केतन इनामदार यांनी राजीनामा दिला आहे. स्वत:च्या आमदारांचं न ऐकणारा पक्ष जनतेचं काय ऐकणार आणि त्यांच्या समस्या कशा सोडवणार?, असे प्रश्न सातव यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारcongressकाँग्रेसRajeev Satavराजीव सातव