Gujarat : गुजरात भाजपनं मुलांसाठी लाँच केलं विशेष चॉकलेट; रॅपरवर पंतप्रधान मोदींचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 22:59 IST2022-04-05T22:58:59+5:302022-04-05T22:59:54+5:30

याशिवाय भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीदरम्यान खासदारांनी विशेष टोपीही परिधान केलेली दिसली. गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी ही टोपी या खासदारांना पाठवली.

Gujarat BJP launches special chocolate for poor children Photo of Prime Minister Modi on the rapper | Gujarat : गुजरात भाजपनं मुलांसाठी लाँच केलं विशेष चॉकलेट; रॅपरवर पंतप्रधान मोदींचा फोटो

Gujarat : गुजरात भाजपनं मुलांसाठी लाँच केलं विशेष चॉकलेट; रॅपरवर पंतप्रधान मोदींचा फोटो

भाजपने गरीब आणि कुपोषित मुलांसाठी पोषक तत्वांनी युक्त असे खास चॉकलेट तयार केले असल्याची माहिती गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी मंगळवारी दिली. "आमच्या निरंजनभाईंनी कुपोषित मुलांसाठी तयार केलेल्या चॉकलेटचे नमुने मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी खासदारांना देण्यात आले," असंही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, चॉकलेटच्या रॅपरवर भारतीय जनता पार्टीची असं प्रिन्ट करण्यात आलंय. तसंच कमळ चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही छापण्यात आला आहे.

त्याचवेळी भाजप संसदीय पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपच्या सर्व मंत्री आणि खासदारांना विशेष टोपी देण्यात आली. चार राज्यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील रोड शोमध्ये घातलेली हीच टोपी असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच खासदारांना एनर्जी बूस्टर चॉकलेट्सही देण्यात आली. 

ही टोपी गुजरात भाजपने तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. ही टोपी पक्षाच्या नेत्यांना प्रचंड आवडली होती. यानंतर दिल्लीतील भाजप संसदीय पक्षाने टोपी आणि एनर्जी बूस्टर चॉकलेट्सची ऑर्डर दिली. सुमारे चारशे नेत्यांना ही टोपी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Gujarat BJP launches special chocolate for poor children Photo of Prime Minister Modi on the rapper