शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; आपल्याच 25 आमदारांचे तिकीट कापणार, 'हे' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:24 IST

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 8 डिसेंबरला निकाल येणार आहेत.

Gujarat Assembly Election 2022: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्यातील 182 मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी होईल. तसेच, अंतिम निकाल 8 डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी जाहीर होणार आहे. 

भाजपची बैठक सुरूगुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यासाठी आता भाजप कोअर कमिटी आणि राज्य निवडणूक समितीच्या नेत्यांची राज्यातील पक्षाच्या मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा आणि छाननी करण्यात येत आहे.

लवकरच उमेदवारांची नावे निश्चित होणारपक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 182 जागांसाठी 4000 हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. आजच्या महत्त्वाच्या बैठकीत गुजरातमधील 13 जिल्ह्यांतील 47 विधानसभा जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, उर्वरित 135 जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर उद्या आणि परवा बैठकीत चर्चा होईल. भाजप केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाकडे जाण्यापूर्वी भाजपच्या सर्व 182 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय येत्या 3-4 दिवसांत केली जाईल.

25 आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतातदरम्यान, गृहमंत्र्यांनी गुजरातमधील त्यांच्या शेवटच्या 6 दिवसांच्या मुक्कामात स्थानिक नेत्यांची प्रमुख निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आणि 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी सर्व विधानसभांना उमेदवारांच्या नावांवर अभिप्राय घेण्यास सांगितले. ज्या नेत्यांचा प्रतिसाद नकारात्मक असेल, त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते, असे मानले जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये यावेळी भाजप विद्यमान आमदारांपैकी सुमारे 25 टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. म्हणजेच एकूण 99 भाजप आमदारांपैकी सुमारे 23-25 ​​आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात.

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूकBJPभाजपा