Gopal Italia : आप नेत्याने भाषण करताना बेल्ट काढून स्वत:लाच मारायला केली सुरुवात, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:09 IST2025-01-07T13:08:05+5:302025-01-07T13:09:11+5:30
AAP Gopal Italia : गोपाल इटालिया हे जाहीर सभेत न्यायाची मागणी करत भावूक झालेले पाहायला मिळाले.

Gopal Italia : आप नेत्याने भाषण करताना बेल्ट काढून स्वत:लाच मारायला केली सुरुवात, नेमकं काय घडलं?
सूरतमध्ये आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया हे जाहीर सभेत न्यायाची मागणी करत भावूक झालेले पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी स्वत:लाच बेल्टने मारायला सुरुवात केली. या प्रकाराने उपस्थित असलेल्या सर्व लोकांना धक्का बसला. गुजरातमध्ये घडलेल्या अनेक वेदनादायक घटनांचा उल्लेख करून ते म्हणाले की, पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
गोपाल इटालिया यांनी आपल्या भाषणात मोरबी पुलाची घटना, हरणीची घटना, तक्षशिला आगीची घटना, राजकोट गेमझोन दुर्घटना आणि दाहोद आणि जसदन येथील बलात्काराच्या घटनांचा उल्लेख केला. या घटनांमध्ये शेकडो लोकांना आपली जीव गमवावा लागला. मात्र भाजपा सरकारच्या निष्काळजीपणाने आणि क्रूर वक्तव्यामुळे पीडितांच्या दुःखात आणखीनच भर पडल्याचं ते म्हणाले.
अन्नामलाई ने राजनीति में ख़ुद को मारने का ट्रेंड सेट कर दिया।
— Shubham Shukla (@ShubhamShuklaMP) January 7, 2025
अब गुजरात में "AAP" ने गोपाल इटालिया ने ख़ुद को बेल्ट मारे।
हालांकि अन्नमालाई बिना शर्ट या ऊपर कोई कपड़ा पहने बिना ख़ुद को मारे थे। pic.twitter.com/VPUyH8LyCG
गोपाल इटालिया म्हणाले की, मी आणि माझ्या पक्षाने शक्य ते सर्व कायदेशीर आणि सामाजिक प्रयत्न केले, पण गुजरातमधील पीडितांना न्याय मिळाला नाही. अमरेलीच्या घटनेतही आपण पोलीस अधिकारी व प्रशासनाची भेट घेतली, मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
न्यायासाठी संघर्ष करूनही यश न मिळाल्याने खूप धक्का बसला आहे. याचं प्रतिक म्हणून स्वत:ला बेल्टने मारून अन्यायाविरोधात जनतेला जागं होण्याचं आवाहन गोपाल यांनी केलं आहे. तसेच ज्या दिवशी जनतेचा आत्मा जागृत होईल, तेव्हा गुजरातमध्ये न्याय मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असंही गोपाल इटालिया यांनी म्हटलं आहे.