गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, 19 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 10:01 AM2018-05-19T10:01:24+5:302018-05-19T10:01:24+5:30

भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत.

Gujarat: 19 people killed, 7 injured after a cement laden truck turned turtle on Bhavnagar-Ahmedabad highway | गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, 19 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, 19 जणांचा मृत्यू

अहमदाबाद- गुजरातमधील भावनगर- अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.



 

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, भावनगर- अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला. या भीषण अपघातात 19 जणांनी जीव गमावला तर 7 जण जखमी आहे. तेथिल जवळच्या हॉस्पिटलमध्ये 7 जणांवर उपचार सुरू आहेत. अपघाताचं नेमकं कारण तपासानंतरच समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान,  अपघाताचं वृत्त समजताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Web Title: Gujarat: 19 people killed, 7 injured after a cement laden truck turned turtle on Bhavnagar-Ahmedabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.