शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखेतील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:20 AM

अखेर शासनाने दिली मान्यता; अनेक महत्त्वपूर्ण सूचनांचा समावेश

मुंबई : कोरोना (कोविड) या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘टास्क फोर्स आॅन आयुष फोर कोविड -१९ समिती’ने राज्य शासनाला उपचारपद्धतीविषयक मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोमवारी राज्य शासनाने या सूचनांना मान्यता दिली असून आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी विषयी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यात कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय व अलाक्षणिक (लक्षणेविरहित) रुग्णांवरील उपचारांसदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत.

या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे, वारंवार साबणाने हात वीस सेंकदापर्यंत धुणे, सर्दी व खोकल्यासाठी शिष्टाचार पाळणे, ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इ. आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी संपर्क टाळावा या सूचनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणेच, या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आयÞुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या उपचार पद्धतींचा अवलंब करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.याविषयी, आयुष टास्क फोर्समधील सदस्य डॉ. जसवंत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या सहकार्यामुळे ही मार्गदर्शक तत्त्वे लवकरात लवकर घोषित होण्यास मदत झाली आहे. या शाखांमधील उपचारपद्धतींमुळे राज्यातील कोरोना (कोविड-१९) वर नियंत्रण मिळविण्यास निश्चितच मदत होईल. त्यामुळे भविष्यातही टास्क फोर्सकडून यासाठी आरोग्य विभागासोबत विविध पातळ्यांवर काम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करत आहोत.‘लोकमत’च्या वृत्ताची दखलदोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये ‘परवानग्यांच्या गर्तेत अडकला होमिओपॅथीचा मार्ग’ हे वृत्त राज्यस्तरावर प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घेऊन त्वरित याविषयी ठोस निर्णय घेतला. यापूर्वीही ‘लोकमत’ने आयुर्वेद व होमिओपॅथी शाखेतील तज्ज्ञांच्या भूमिकाही लोकमतने पाठपुरावा केला होता. या विषया संदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले, याची दखल केंद्र शासनाने घेतली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAyurvedic Home Remediesघरगुती उपाय