'पत्नीमागे पळणे ही गुंडूरावांची कामगिरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:46 IST2019-01-29T04:02:04+5:302019-01-29T06:46:36+5:30

अनंतकुमार हेगडेंचे असभ्य वक्तव्य; भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

'Gudiurawa's performance for wife behind' | 'पत्नीमागे पळणे ही गुंडूरावांची कामगिरी'

'पत्नीमागे पळणे ही गुंडूरावांची कामगिरी'

बंगळुरू : स्वत:ची मुस्लिम पत्नी तबू राव हिच्या मागे पळणे हीच कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांची मुख्य कामगिरी आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय कौशल्यविकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले. हिंदू महिलेवर अत्याचार करू पाहणारे हात उखडून टाकू, या हेगडे यांनी केलेल्या विधानावर गुंडूराव यांनी टीका केल्याने त्यांना हेगडे यांनी असभ्य शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. राज्यघटनेतील सेक्युलर शब्द काढून टाकण्यासाठी भाजपा सरकार सत्तेवर आले, असेही हेगडे दोन वर्षांपूर्वी म्हणाले होते.

हेगडे यांना हाकला - राहुल गांधी
गुंडूराव यांच्या पत्नीचा उल्लेख करून वादग्रस्त वक्तव्य केलेले केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे हे त्या पदावर राहण्यास अपात्र आहेत. त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

Web Title: 'Gudiurawa's performance for wife behind'