शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:14 IST

GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे

ठळक मुद्देतज्ज्ञ मंडळींना जीएसटी समजलेला नसेल तर मला काय समजणार, त्यामुळे मी त्यावर बोलणं उचित होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंजीएसटीची रचना चांगली नसून तो अत्यंत घाई घाईत लागू करण्यात आला अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली

नवी दिल्ली - GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे. मीच काय अगदी तज्ज्ञ असलेल्या सीएंना व व्यापाऱ्यांनाही अजून जीएसटी नीट समजलेला नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. जर, तज्ज्ञ मंडळींना जीएसटी समजलेला नसेल तर मला काय समजणार, त्यामुळे मी त्यावर बोलणं उचित होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.अर्थात, काही काळ गेल्यानंतर नवीन कररचना लक्षात येईल अशी मल्लीनाथीही त्यांनी नंतर केली. या वर्षी जुलै महिन्यापासून अनेक कर रद्द करून एकच कर म्हणून जीएसटी लागू करण्यात आला. सोपी करप्रणाली असं वर्णन करण्यात आलेला जीएसटी प्रत्यक्षात मात्र क्लिष्ट व व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी असल्याची टीका सगळ्या थरांतून होत आहे.जीएसटीची रचना चांगली नसून तो अत्यंत घाई घाईत लागू करण्यात आला अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची टीकाही गांधी यांनी केली आहे.नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या सभेमध्ये गांधी यांनी जीएसटीवरही सडकून टीका केली. सरकारी अडथळे असलेला, क्लिष्ट असा जीएसटी असून त्यामुळे सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप गांधींनी केला आहे. आधुनिक जगातील हे लायसन्स राज असून सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात नको इतकी सत्ता जीएसटीमुळे गेल्याचा दावाही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजपाच्याच आमदाराने जीएसटी क्लिष्ट असल्याचे व तज्ज्ञांनाही समजत नसल्याचे विधान केल्यामुळे हा भाजपा सरकारला घरचा आहेर असल्याचे मानण्यात येत आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीArun Jaitleyअरूण जेटली