अर्थसंकल्पादिवशीच सरकारला मिळाली गुड न्यूज, जीएसटीने भरला खजिना   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 20:55 IST2025-02-01T20:54:27+5:302025-02-01T20:55:14+5:30

GST Collection: आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्र सरकारने जीएसटी कलेक्शनचे जानेवारी महिन्यातील आकडे प्रसिद्ध केले आहेत. जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात १.९६ लाख रुपयांची भर पडली आहे.  

GST Collection: The government got good news on the budget day itself, GST filled the treasury. | अर्थसंकल्पादिवशीच सरकारला मिळाली गुड न्यूज, जीएसटीने भरला खजिना   

अर्थसंकल्पादिवशीच सरकारला मिळाली गुड न्यूज, जीएसटीने भरला खजिना   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारचा अर्थसंकल्प आज वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दरम्यान, आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्र सरकारनेजीएसटी कलेक्शनचे जानेवारी महिन्यातील आकडे प्रसिद्ध केले आहेत. जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात १.९६ लाख रुपयांची भर पडली आहे.  

जानेवारी महिन्यातील सरकारचं जीएसटी कलेक्शन हे मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२.३ टक्क्यांनी वाढलं आहे. तसेच तसेच मागच्या महिन्यात सेंट्रल जीएसटी कलेक्शन ३६ हजार १०० कोटी रुपये आणि स्टेट जीएसटी कलेक्शन ४४ हजार ९०० रुपये एवढं नोंदवलं गेलं आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०२४ या महिन्यातील जीएसटी कलेक्शन हे १.७६ लाख कोटी रुपये एवढं होतं, ते वार्षिक आघारावर ७.३ टक्के अधिक होतं. जानेवारी महिन्यातील जीएसटीचा आकडा हा आतापर्यंच्या सर्वाधिक जीएसटी कलेक्शनपेक्षा किंचित कमी राहिला आहे. याआधी गतवर्षी एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शन २ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं होतं.  

जीएसटी कलेक्शनचा आकडा सातत्याने वाढत आहे आणि सरकारच्या खजिन्यामध्ये भर पडत आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात हा आकडा १ लाख ७३ हजार २४०, ऑक्टोबर महिन्यामध्ये १ लाख ८७ हजार ३४६,  तर नोव्हेंबर महिन्यात  १ लाख ८७ हजार ३४६ कोटी रुपये एवढा जीएसटी गोळा झाला होता.   

Web Title: GST Collection: The government got good news on the budget day itself, GST filled the treasury.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.