शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला कोरोना, रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच दोघांचेही कुटुंब क्‍वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:41 IST

चंदिगड :   पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. येथे कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाचा परिणाम ...

ठळक मुद्देसंबंधित नवरदेव हा फरीदकोट तर नवरी मोगा येथील आहेगेल्या महिन्यातच झाला होता दोघांचा साखरपुडानवरीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेले कुटुंबही क्वारंटाईन

चंदिगड :  पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. येथे कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाचा परिणाम लग्न समारंभांवरही होताना दिसत आहे. पंजाबमधील मोगा येथे कोरोनामुळे एक लग्न समारंभ रद्द करण्याची वेळ आली. कारण येथे बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या महिन्यातच झाला होता साखरपुडा -संबंधित नवरदेव हा फरीदकोट तर नवरी मोगा येथील आहे. या दोघांचे लग्न आज (सोमवार) होणार होते. एक महिन्यापूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच मुलाला कोरोना झाल्याचे समजले. यामुळे हे लग्न रद्द करावे लागले. यानंतर आरोग्य विभागाने नवरदेव आणि नवरी यांच्या कुटुंबांना क्वारंटाईन केले आहे. नवरदेवाची प्रकृती स्थिर आहे.

रात्री उशिरा रुग्णवाहिकेमागे पोलिसांच्या गाड्या -मोगा येथील परमानंद भागात रात्री उशिरा एका रुग्णवाहिकेमागे पोलिसांच्या अनेक गाड्या दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यानंतर, ज्या मुलीचे लग्न ठरले होते त्या मुलीच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी हा ताफा आल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी रात्रीच संर्व कुटुंबियांची तपासणी केली. यात कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. मात्र, त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.यासंदर्भात, पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीसही लावली आहे. मुलीच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणखी एका कुटुंबालाही होम क्वारंटाईन कण्यात आले आहे कारण हे कुटुंबही साखरपुड्यात सहभागी झाले होते.

39 पैकी 35 सॅम्पल निगेटिव्हयेथील सिव्हिल रुग्णालयात आतापर्यंत 39 सॅम्पल तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 35 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. ते चारही जम मुंबईतील असून जमातशी संबंधित आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबIndiaभारतdoctorडॉक्टरPoliceपोलिसmarriageलग्न