शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 19:34 IST

राणा कपूरने घोटाळे केल्यानंतर मार्चमध्ये खळबळ उडाली होती. Yes Bank वर निर्बंध लादण्यात आले होते. SBIने मार्चमध्ये येस बँकेत 49 टक्क्यांची हिस्सेदारी घेतली होती. तसेच एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने एफपीओमध्ये 1760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : हजारो कोटींच्या घोटाळ्यामुळे आर्थिक संकटात असलेली खासगी क्षेत्रातील Yes Bank 15 हजार कोटींचे शेअर विकणार आहे. महत्वाचे म्हणजे हे शेअर निम्म्या किंमतीत विकले जाणार असून 15 जुलै ते 17 जुलै अशी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. शेअरची आधारभूत किंमत 12 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

राणा कपूरने घोटाळे केल्यानंतर मार्चमध्ये खळबळ उडाली होती. Yes Bank वर निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे बँकेचे शेअर कमालीचे गडगडले होते. मात्र, नंतर केंद्रीय अर्थ मंत्रालय़ाने येस बँक पुनरुज्जीवन योजना 2020 घोषणा जाहीर करत बँकेच्या नव्या संचालक मंडळावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन संचालक नियुक्त केले होते. यामुळे येस बँक पुन्हा उभा राहणार हे निश्चित झाले होते. 

आता या संकटामुळे येस बँकेने बाजारातून पैसा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे 15 जुलैला फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) खुला केला जाणार असून यातून 15 हजार कोटी रुपये गोळा करण्यात येणार आहेत. एफपीओसाठी किमान दर 13 रुपये असणार आहे. यासारखीच 2 रुपयांच्या शेअरसाठी फ्लोअर प्राईज 6 पट आणि कॅप प्राईज 6.5 पट ठेवण्यात आली आहे. या योजनेत कमीतकमी 1000 शेअरची बोली लावायची आहे. तर हजाराच्या पटीत कितीही बोली लावता येणार आहे. बँकेच्या पात्र कर्मचाऱ्यांना 1 रुपया सूट देण्यात येणार आहे. 

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, एफपीओतून येणारा पैसा हा बँकेच्या पुढील दोन वर्षांचा विकास करण्यासाठी पुरेसा असणार आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी संख्या आवाक्यात ठेवण्यात येणार आहे. SBIने मार्चमध्ये येस बँकेत 49 टक्क्यांची हिस्सेदारी घेतली होती. तसेच एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने एफपीओमध्ये 1760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. बँक शुक्रवारी शेअर बंद भावापेक्षा निम्म्या किंमतीने विकणार आहे. बँकेने काही प्रकरणांमध्ये अडकलेल्या मालमत्तांची ओळख पटविली आहे. कार्पोरेट कर्जही 55 टक्क्यावरून 40 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Rajasthan Political Crisis: गेहलोत बहुमतात, तरीही आमदार अज्ञातस्थळी? भाजपकडून फ्लोअर टेस्टची मागणी

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

टॅग्स :Yes Bankयेस बँकSBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया