नातवंडे आजोबांच्या अंत्यदर्शनापासून वंचित

By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:08+5:302015-01-30T00:54:08+5:30

Grandfather deprived of grandfather's introspection | नातवंडे आजोबांच्या अंत्यदर्शनापासून वंचित

नातवंडे आजोबांच्या अंत्यदर्शनापासून वंचित

>- गो-एअरचे विमान रद्द : नातेवाईकांचा गोंधळ
नागपूर : कोलकातावरून पटणा येथे जाणारे गो-एअरचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने नातवंडांना आजोबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापासून वंचित राहावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, संगमनगर येथील रहिवासी जीनत नय्यर हसन (३१) या मृताच्या स्नुषा आहेत. जीनत या मुलगी आयशा, निशा, मुलगा हसन आणि भाऊ मो. जावेद मलिक यांच्यासोबत सकाळी ९.२० वाजता गो-एअरच्या जी ९-२९३ या विमानाने कोलकाता येथे रवाना झाल्या. त्यांना कोलकाता येथून गो-एअरच्या कनेटिंग जी ९-५४१ या विमानाने पटणा येथे जायचे होते. परंतु दुपारी २ वाजता कोलकाता विमानतळावर या विमानाचे उड्डाण ऐनवेळी रद्द झाले. कोलकाता येथे बहीण जीनत अडकल्याने नागपुरातील त्यांचे भाऊ मो. नौशाद हे मित्र शारिक जमा यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांनी गो-एअरच्या काऊंटरवर उड्डाणाची विचारपूस केली. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि गोंधळ घातला. लोकमतशी बोलताना नौशाद यांनी सांगितले की, बहिणीच्या सासऱ्याचे पटणा येथे निधन झाले. नातेवाईकांच्या दर्शनासाठी त्यांच्या पार्थिवावर एक दिवस उशिरा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी चार जणांनी गो एअर या विमान कंपनीचे नागपूर-कोलकाता आणि कोलकाता-पटणा असे कन्फर्म तिकीट काढले. पण कोलकाता येथे विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने नातवंड आपल्या आजोबांचे अंतिम दर्शनापासून वंचित राहिले.

Web Title: Grandfather deprived of grandfather's introspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.